बुडत्याचा पाय खोलात. सध्या अभ्यंकर कंपूची स्तिथी तशीच झाली आहे.
उत्तरं देता येत नाहीत म्हणून सध्या खाजगीत शिवीगाळ वर आले आहेत. पुण्याच्या बऱ्याच माहितगार लोकांनी मला अभ्यंकर कंपू पासून 'सावध' रहायला सांगितले आहे. नीच पातळीवर उतरू शकतात असा सावधगिरीचा इशारा त्या मित्रांनी दिला.
साधारण पणे १०-१२ वर्षा पूर्वी ३-४ कोटीचा एक लोन अकाउंट बुडीत खाती जमा झाला होता. त्या कर्ज बुडव्याला अभ्यंकर व गोखले ह्यांनी बँकेच्या मुख्यालयात नोटीस काढून भेटायला बोलावले.
वसुलीच्या बाबतीत बोलायचे सोडून त्याच्या समोर माझ्या नावाने शिमगा केला.
"किशोर सात्विक ने तुमच्या अकाउंट विषयी RBI कडे तक्रार केली आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस काढली आहे. त्याने आम्हाला हैराण करून सोडलं आहे."
खरे म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वीची केस असल्या मुळे माझ्या investigation खाली हा अकाउंट नव्हता. व मला माहीत सुध्दा नव्हता.
असो,
परंतु हा शिमगा बँकेतल्या भ्रष्टाचारा बद्दलच बरंच काही सुतवाच करतो.
आता अभ्यंकर कंपू खालील प्रश्नांची उत्तरं देतील काय?
१. १२ वर्ष काय कंपू झोपला होता काय? नोटीस काढण्या करता माझ्या नावाचा वापर - has effectively
underlined their demonstrated discomfort and revealed reluctance to go after
willful and fraudulent defaulters for reasons that are now becoming crystal
clear to every person of even ordinary prudence.
२. ह्या कर्ज बुडव्याव्यतिरिक्त आणखीन किती बुडव्यांना नोटीस काढून बोलावले आहे? मग गेली ५-६ वर्षे काय करत होता?
३. मी दिलेल्या यादीतील ६२ कर्जबुडवे बँकेचे रु. २,९१७ कोटी डुबवून बसले आहेत. त्यांचा NPA ratio २९.१% होतो. त्या पैकी किती बुडव्यांकडून किती वसुली केली ते पण जरा लोकांना सांगितलं तर बरं होईल.
४. RBI बँकेच्या मागे लागली आहे म्हणजे नक्की काय करत आहे? त्याचा सविस्तर खुलासा करणे अभ्यंकर कंपूवर बंधनकारक आहे. ते ठेवीदारांच्या व सभासदांच्या हितासाठी जरुरी आहे.
५. मालेचंद्र माधवचंद्र बिस्वास उर्फ कॉसमॉस बँकेचा छोटा मल्ल्या ह्या रु.१३० कोटीच्या कर्ज बुडव्या कडून किती वसुली केली? रु.६० लाख वसूल केले असं फार अभिमानाने मला ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यावेळचे MD विक्रांत पोंक्षे ह्यांनी व नंतर मार्च २०१७ मध्ये खुद्द मुकुंद अभ्यंकर व मिलिंद काळे ह्यांनी सांगितलं होतं. ह्या एकाच fraud NPA वरून संपूर्ण संचालक मंडळ व बँकेचे काही अधिकारी निदान १० वर्षे तरी येरवड्याला जातात. बाकीचे घोटाळे मोजले तर उरलेलं संपूर्ण आयुष्य येरवड्याला घालवायला लागेल. सगळ्यांचा 'सेल' नंबर एकच ही सुविधा सरकारतर्फे नक्कीच मिळेल.
अभ्यंकरांनी केबिन मध्ये बसून फुकाचा शिमगा करण्या पेक्षा व ८.५% व्याजाचं आमिष दाखवण्या पेक्षा, निदान मी नमूद केलेल्या प्रत्येक ६२ कर्जबुडव्या कडून रु.२,९१७ कोटींसमोर आत्ता पर्यंत किती वसुली केली हे ठेवीदारांना व सभासदांना सांगितलं तर बरं होईल.
ता.क.: ही पोस्ट अभ्यंकर, काळे व गोयल ह्यांनाही WhatsApp वरून पाठवली आहे.
No comments:
Post a Comment